Thakle Re Nandlala
Asha Bhosle Lyrics


Jump to: Overall Meaning ↴  Line by Line Meaning ↴

नाच नाचुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला

निलाजरेपण कटीस नेसले निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची
उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला

विषयवासना वाजे वीणा अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायी कुसंगती कर ताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी
लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला
थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला

स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी
अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला




थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
थकले रे नंदलाला

Overall Meaning

The lyrics of Thakle Re Nandlala are written in Marathi language and the song is sung by Asha Bhosle. The song portrays a woman, who is exhausted and feeling weary from the struggles and trials of life. She is tired of dancing and moving endlessly, and seeks solace and rest. She cries out to Lord Krishna, who is known for his playful and joyful nature, as Nandlala. She seeks his grace to help her overcome her exhaustion and renew her strength.


The woman speaks about the challenges she faces in life, such as the constant pursuit of material desires, the allure of temptation, and the darkness of ignorance. Despite all these challenges, she knows that Lord Krishna's love will help her overcome all her troubles. The song is a plea for divine intervention and a reminder that even in the darkest moments of life, faith can help one overcome adversity.


Overall, the lyrics of Thakle Re Nandlala remind us that life is full of trials and tribulations, but we must have faith and seek divine intervention to overcome our struggles.


Line by Line Meaning

नाच नाचुनी अती मी दमले
I dance and dance excessively, causing exhaustion


थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
Oh Lord Nandlal, I am tired and exhausted


निलाजरेपण कटीस नेसले निसुगपणाचा शेला
I have shed tears of sadness and my shoulders have slumped with the burden of life's struggles


आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला
My pride has been subdued while I humbly praise the divine


उपभोगाच्या शतकमलांची उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला
I have tasted the fleeting pleasures of life, which have left me unfulfilled


विषयवासना वाजे वीणा अतृप्ती दे ताला
Desires and attachments play like a musical instrument, leaving me unsatisfied


अनय अनीती नुपूर पायी कुसंगती कर ताला
Bad company has led me astray, causing me to stumble


लोभ प्रलोभन नाणी फेकी लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला
Greed and temptation have deceived me, leaving me empty-handed


स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
I have fallen into a self-made trap, blinded by darkness


तालाचा मज तोल कळेना सादही गोठून गेला
Unable to measure the rhythm, I have lost my way


अंधारी मी उभी आंधळी अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला
Lost and blinded, I am searching for the light to guide me in this journey of life


थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
Oh Lord Nandlal, I am tired and exhausted




Lyrics © O/B/O APRA AMCOS
Written by: Sudhir Phadke, G D Madgulkar

Lyrics Licensed & Provided by LyricFind
To comment on or correct specific content, highlight it

Genre not found
Artist not found
Album not found
Song not found
Most interesting comments from YouTube:

@vedasuhas

🍁 नाच नाचुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला

💥 हे गाणे जेव्हा फारशी समज नव्हती तेव्हा ऐकतांना ..वाटे कोणीतरी नर्तकी नाचून किती दमलेय मी ते सांगतेय कृष्णाला ..मात्र जेव्हा बऱ्यापैकी समज आली ..पुलाखालूनच नव्हे तर पुलावरूनही बरेच पाणी गेले तेव्हा हे गाणे नीट अर्थासहित ऐकले अन हादरलोच ..वाटले ही तर आपलीच व्यथा सांगतेय ..या मोहमायेच्या चक्रात आपणही असेच नाचतोय ..भरकटतोय ..चकवा लागलाय ..

निलाजरेपण कटीस नेसले,
निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी,
गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला

💥. जनाची नाही तर मनाची तरी हवी म्हणतात ..तसेच झालेय मनाचीही संपलीय ..कोणीही कितीही निंदा ..आमचा एकच धंदा असेच ..सतत स्वतची स्तुती..प्रशंसा..तारीफ ऐकायला आवडतेय आपल्याला ..हा ' स्व ' विरघळून जाण्याऐवजी आपण त्यालाच कुरवाळत बसलोय ..माझ्या इच्छा ..माझ्या आवडी ..माझे आनंद ..खाण्याच्या पदार्थांपासून ते सर्व भौतिक सुखांचा हव्यास ..तोच ध्यास ..

विषयवासना वाजे वीणा
, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायी,
* कुसंगती कर ताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी
* मजवर आला गेला

💥. काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर हे सारे विकार नेहमी मनात कोणती ना कोणती अभिलाषा उत्पन्न करतात ..त्या भोगांच्या आशेने जीव सुखावतोय..काही न काही हवेच आहे ..' समाधान ' मात्र अजिबात नाही ..या विकारांच्या कुसंगतीत अतृप्ती अजूनच पेटणार ...वेग येणार हव्यासपूर्ती साठी ..

स्वतःभोवती घेता गिरक्या,
अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना,
सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी,
जीव जीवना भ्याला

💥. हे असे किती काळ ? मी ..माझे सुख ..माझा आनंद ..माझी मजा ..यातच आयुष्य निघून जाते ..अगदी आयुष्याच्या संध्याकाळी समजते आपण कुठेच पोचलो नाही ..त्याच त्याच ठिकाणी रमतोय ..मनावर निबरपणाचा थर साचतो ..जेव्हा गात्रे थकतात..हाकेच्या अंतरावर मृत्यू वाट पाहतोय असे जाणवते तेव्हा खरी भीती वाटू लागते ..भूतकाळाच्या सावल्या मानगुटीवर बसतात ..वर्तमान धूसर होत जातो तर पुढे अंधार ..छे असे काही होण्यापूर्वी सावरता आले तर किती छान ..

*हे विकार..हेवेदावे ..हव्यास ..अट्टाहास..काही काही सोबत येणार नाहीय ..त्याऐवजी जर कोणाशी चार गोड शब्द बोललो ..कोणाला संकटात मदत केली ..कोणाच्या भावना जीवापाड जपल्या ..तर तर ..आधीच सावरता येईल हे नक्की ,,
त्या विध्यात्याने जसे मानवाला विकार दिलेत तसेच मोक्षाचेही ज्ञान दिलेय ..मुक्तीचाही मार्ग दाखवलाय* *..आता हे नाचणे बंद करावे हेच खरे !
🙏🙏.......................



@aniruddhakaryekar2390

गदिमांचं गाणं सुरेख , बाबूजींची चालही सुंदर , चित्रीकरण भिकार, नटी त्याहून बेकार । सिनेमाची कथा खरी घडलीय का ? का काल्पनिक ?
'जगाच्या पाठीवर' मधील गाणी सुरेखच !पण यायला हवी होती , सुमनताईंच्या आवाजातून ।

ह्या आवाजात र व च वर्गीय व्यंजनांचा, आकार सगळे चुकीचे ऊच्चार योग्य नाहीत । चुकीचे ऊच्चार हे ह्या आवाजाचे वैशिष्ट्य! सर्व लाडिक तमाशातील लावणीसारखं वाटतं ,गाणं ऐक ताना, लावण्या मात्र ह्या आवाजात बरोबर वाटतात । बाबूजी, तुम्ही तुमचं आयुष्य , तुमची खूप शक्ती या मादक आवाजाचं सुगम संगीतातील भावगीताला शोभेल असं रूपांतरण करण्या साठी घालवलतं ।

तरीही तुमचं नाव लावणारा श्रीधर या आवाजाला पर्याय नाही म्हणतो ???म्हणजे याला आवाजातील काही कळतच नाहीत कारण याला स्वतःलाच आवाज नाही ।तरीही हा गीत रामायण गातो ? नवलच आहे !


मेंदुतील रचना बदलते ,सारखं मादक गाणी गाऊन, म्हणून मराठीतील गुणी गायिकांनी हिंदी गायचं तर फक्त्त भजनं गायला हवीत । न्युरोसायंन्स याचं ऊत्तर देते ।

गाण्यात भाव जसा तसाच आवाज होतो । आशाबाईंनी सगळी मादक, शृंगारिक,हुच्च, ग्रामीण बाजाची , कृत्रिम लबाड , नायिकांची गाणी गायली म्हणूनच ती माझ्या सारख्या खऱ्या कानसेनाला आवडत नाहीत, रूचत नाहीत व सहनही होत नाहीत।

तरीही ह्या आशा बाई वयाच्या ८०+ ला गातात ?????
कधी या नवोदित चांगल्या आवाजाच्या गुणी गायिकांना जागा करून देणार?

२/३पिढ्यांच्या गायिकांच नुकसान केलं । यांनी या मंगेशकर भगिनींनी !!आपल्याच कुटुंबात हिंदी व मराठी सिनेसृष्टी वाटून घेतली । मग बाळ का नाही गेला हिंदी त ? कार ण मराठीतील वर्चस्व सोडायचं नव्हतं ।

ऊषानं दादा कोंडक्यांच्या सिनेमातील ग्रामीण गाणी गायली । तिच्या तोंडी भजनं ऐकवत नाहीत ।मेंदू विज्ञानात याचं ऊत्तर मिळालं ।
नवल वाटलं नाही ।

आशानं ज्या नायिकांना आवाज दिला त्या सगळ्या मादक अदाकारीतील खोट्या प्रेम पात्रांना । हिनं ड्रायव्हर बरोबर लग्न केलं । नायिकांनी तेच केलं। अनु लोम विवाह ।त्यामुळे आवाज बिघडला। खरं तर या अशा आवाजांनी ३५पर्यंतच गायला हव ।असं कुठतरी वाचलय! कारण आत्ता समजलं । मागे न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर बाळ मंगेशकरांचा कार्यक्रम झाला होता । त्यात छचोर पोरीसारख्या या साठीच्या बाई ,आशाबाई मादक हाव भाव करून नाचल्या होत्या व आवाज तर ऐकूच शकलो नाही ।

मेंदूूत तेव्हाच बदल झाले असणार । 'साठी बुध्दी नाठी 'मराठीतील म्हण फुकट नाही आली !

तेव्हा पासून त्या कायम थिरकतच आल्यात ।


(लताबाई तेवढं करत नाहीत हे आमचं नशीब ।)

तेव्हाच ओमकारेश्वर मंदिरात एक गाण्यांचा कार्यक्रम ऐकला होता ।कटककर का काय आडनाव होतं त्यातील प्रमुख गायिकेचं । बालगाणी ते सिने गाणी, भावगाणी खूपच छान गायली होती ,मूळ आवाजापेक्षा । नंतर मी हा आशाबाईंचा भिकार कार्यक्रम ऐकला ।
त्यावर सकाळला खरमरीत प्रतिक्रियाही पाठवली होती। पण या बुजुर्ग गायिका ना ! सकाळ नी ती छापली नाही कारण सकाळ तोवर विकला गेला होता ।

मेंदू विज्ञान सध्या वाचल्यावर या सर्वांचा ऊलगडा झाला ।

त्यानंतर मी गाण्याचे कार्यक्रम खूप ऐकले पण प्रतिक्रिया देणं थांबवलं । आज अनेक वर्षांनी याची आठवण झाली ।म्हणून या चावडीवर लिहितोय ।

लताबाई ३५ पर्यंत चांगल्या गायल्यात । त्यांनी ३५,वर्षाला थांबायला हवं होतं पण त्या मात्र पोटासाठी गातच राहिल्या! हाव संपली नाही त्यांची ।
यांच्या चेहऱ्यावर ज्ञानदेवांचे अभंग म्हणतानाही चेहरा अहंकाराने फुललेला दिसतो । बाळासाहेबांना नाही दिसत ? नवलच आहे या गोष्टीचं ,?

मेंदू विज्ञानातही सर्व ऊत्तरे मिळाली ।

नवलाचीच बाब आहे झालं।।

मनातप्रश्न येतो काय नि मेंदू विज्ञान याचं ऊत्तरही शोधून काढतं ।

आता या गुणी गायिकांना नुकसान भरपाई या मंगेशकर भगिनींनी दिली तर नवल वाटेल पण द्यावी त्यांनी ! व त्यांच्या कुटुंबियांनी ! , सुधीर फडके कुटुंबियांनी , राजा परांजपे कुटुं बियांनीही द्यावी। तरच न्याय मिळेल ।



All comments from YouTube:

@vedasuhas

🍁 नाच नाचुनी अती मी दमले
थकले रे नंदलाला

💥 हे गाणे जेव्हा फारशी समज नव्हती तेव्हा ऐकतांना ..वाटे कोणीतरी नर्तकी नाचून किती दमलेय मी ते सांगतेय कृष्णाला ..मात्र जेव्हा बऱ्यापैकी समज आली ..पुलाखालूनच नव्हे तर पुलावरूनही बरेच पाणी गेले तेव्हा हे गाणे नीट अर्थासहित ऐकले अन हादरलोच ..वाटले ही तर आपलीच व्यथा सांगतेय ..या मोहमायेच्या चक्रात आपणही असेच नाचतोय ..भरकटतोय ..चकवा लागलाय ..

निलाजरेपण कटीस नेसले,
निसुगपणाचा शेला
आत्मस्तुतीचे कुंडल कानी,
गर्व जडविला भाला
उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला

💥. जनाची नाही तर मनाची तरी हवी म्हणतात ..तसेच झालेय मनाचीही संपलीय ..कोणीही कितीही निंदा ..आमचा एकच धंदा असेच ..सतत स्वतची स्तुती..प्रशंसा..तारीफ ऐकायला आवडतेय आपल्याला ..हा ' स्व ' विरघळून जाण्याऐवजी आपण त्यालाच कुरवाळत बसलोय ..माझ्या इच्छा ..माझ्या आवडी ..माझे आनंद ..खाण्याच्या पदार्थांपासून ते सर्व भौतिक सुखांचा हव्यास ..तोच ध्यास ..

विषयवासना वाजे वीणा
, अतृप्ती दे ताला
अनय अनीती नुपूर पायी,
* कुसंगती कर ताला
लोभ प्रलोभन नाणी फेकी
* मजवर आला गेला

💥. काम , क्रोध , लोभ , मद , मोह , मत्सर हे सारे विकार नेहमी मनात कोणती ना कोणती अभिलाषा उत्पन्न करतात ..त्या भोगांच्या आशेने जीव सुखावतोय..काही न काही हवेच आहे ..' समाधान ' मात्र अजिबात नाही ..या विकारांच्या कुसंगतीत अतृप्ती अजूनच पेटणार ...वेग येणार हव्यासपूर्ती साठी ..

स्वतःभोवती घेता गिरक्या,
अंधपणा की आला
तालाचा मज तोल कळेना,
सादही गोठून गेला
अंधारी मी उभी आंधळी,
जीव जीवना भ्याला

💥. हे असे किती काळ ? मी ..माझे सुख ..माझा आनंद ..माझी मजा ..यातच आयुष्य निघून जाते ..अगदी आयुष्याच्या संध्याकाळी समजते आपण कुठेच पोचलो नाही ..त्याच त्याच ठिकाणी रमतोय ..मनावर निबरपणाचा थर साचतो ..जेव्हा गात्रे थकतात..हाकेच्या अंतरावर मृत्यू वाट पाहतोय असे जाणवते तेव्हा खरी भीती वाटू लागते ..भूतकाळाच्या सावल्या मानगुटीवर बसतात ..वर्तमान धूसर होत जातो तर पुढे अंधार ..छे असे काही होण्यापूर्वी सावरता आले तर किती छान ..

*हे विकार..हेवेदावे ..हव्यास ..अट्टाहास..काही काही सोबत येणार नाहीय ..त्याऐवजी जर कोणाशी चार गोड शब्द बोललो ..कोणाला संकटात मदत केली ..कोणाच्या भावना जीवापाड जपल्या ..तर तर ..आधीच सावरता येईल हे नक्की ,,
त्या विध्यात्याने जसे मानवाला विकार दिलेत तसेच मोक्षाचेही ज्ञान दिलेय ..मुक्तीचाही मार्ग दाखवलाय* *..आता हे नाचणे बंद करावे हेच खरे !
🙏🙏.......................

@milindb8339

रवींद्र जी अतिशय समर्पक असे विचार गाण्यात आहेत आणि ते आपण अतिशय उत्तम रीतीने सांगितले आहेत खरंच खूप खूप धन्यवाद , आणि अशी अर्थपूर्ण गाणी लिहिणारे ग दि माडगूळकर जी आणि त्याला चाल लावणारे सुधीर फडके जी आणि गाणी गाणारी महागायिका आशा जी आणि पडद्यावर अभिनय करणारे राजाभाऊ आणि सिमताई सगळेच गंधर्वाचे अवतार , आणि आपण भाग्यवान हे सगळे पाहिले आणि काही अंशी समजले म्हणून , पुन्हा एकदा धन्यवाद !!!

@noralilakhani1829

Ravindraji your explanation is so good I am pretty old felt as if some one is describing my life Thanks

@milindb8339

आज हे गाणे ऐकले आणि यु ट्यूब वर पूर्ण गाणे वाचले आणि आज त्याचा अर्थ कळला , आणि जीवनाचा अर्थ समजला , खरंच ग दि मा ह्यांना देवीचा आशीर्वाद होता हे लक्षात आले कोटी कोटी प्रणाम

@deepakpatil6045

आशा ताईंचा आवाज खूप सुंदर आहे त्यांची जुनी गाणी भोवतात सतत ऐकत रहावेसे वाटते

@govindpadgaonkar8304

This song is sung only by the great singer Asha Bhosale. In the title, it us mentioned that it is sung by asha bhosale n sudhir phadke. Song is sung excellently by asha tai. Hats off

@sundaresan1944

Thanks for yr nice comments. My apologies ... I have made correction to the title of the song.

@sAjitP

@@sundaresan1944 In the movie this song is a duet.. Sudhir Phadke and Asha Bhosle.

@sujatakarle5826

Geet, sangeet aani play back hyancha apratim milaf aahe he gaana

@vishwajitpawar4076

जीवन हे कष्टप्रद व नियतीपुढे असहाय असते. व्यावहारिक जगात सामान्यपणे आपण पिचले व भरडले जातो. रागलोभकाम आदी षड्रिपूंच्या आहारी गेल्यावर वाईट गोष्टीना कारणीभूत होतो. पण आतमध्ये मन खात असते. ही अपराधी भावना गदिमांनी सुरेख टिपली आहे. आशाजींचा सुरेल स्वर मन कातर करतो. मग असे वाटते की जणु काही हे आपल्याच जीवनाचे प्रतिबिंब आहे. संगीत अप्रतिम आहे.

More Comments

More Versions